नाशिक – राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, कवी,लेखक अशोक कुमावत यांच्या ‘चला तुम्हीही जिंकणारच’ या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन सोहळा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक,माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते संपन्न झाला. या पुस्तक प्रकाश सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीन बनसोड यांनी सांगितले की, यशस्वी कर्मयोध्यांची संघर्षगाथा म्हणजे ‘उठा तुम्हीही जिंकणारच’ हे पुस्तक आहे. या प्रेरणादायी लेखमालेतुन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लेखकाचे लेख पोहचले याचा आम्हा नाशिककरांना सार्थ अभिमान आहे. एका प्राथमिक शिक्षकाकडून संपूर्ण महाराष्ट्राला वाचनाचे वेड लावणारी आतापर्यंतच्या ८५५ लेखांची प्रेरणादायी लेखमाला रोज वाचकांपर्यंत पोहचते असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या प्रसंगी त्यांनी स्वतःच्या जीवनाचा खडतर प्रवास वर्णन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
नाशिकचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी इतिहास घडविणारी माणस इतिहास विसरू शकत नाही असे सांगतांना जीवनात अचानक उदभवलेल्या आजारांना, संकटाना न डगमगता सकारात्मक ऊर्जेच्या साहाय्याने यशाची उत्तुंग भरारी कशी घ्यावी हे जर जाणून घ्यायचे असेल तर’उठा तुम्हीही जिंकणारच’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे व संग्रही ठेवावे असे वर्णन करतांना लेखकाचे ५० ते ६० हजार वाचक उभ्या महाराष्ट्रात रोज सकाळी पहाटेचा नवा विचार वाचतात ही शिक्षण क्षेत्र आणि समाजाच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी वाचनातून माणूस घडतो आणि अशा कर्तृत्ववान व्यक्तीच्या संघर्षगाथा वाचून आपल्या वाचनालयातून शेकडो अधिकारी घडल्याचे सांगितले. आमच्या लेखकाच्या प्रती महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यासह सातासमुद्रापार सिंगापूरपर्यंत प्रकाशन होण्याच्या आत बुकिंग झाल्या. ही कदाचित महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील पहिलीच घटना असेल असे सांगून लेखकाच्या या प्रति १७५ शासकीय वाचनालयात पोहचविण्यासाठी प्रयत्न करू अशा शुभेच्छा दिल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी .रवींद्र नाईक यांनी खेळातून जसे शरीर कमावता येते तसेच पुस्तकातून समाज उभा करता येतो असे सांगून पुस्तकातील उल्लेख केलेल्या महान खेळाडूंचे वर्णन केले. अनेक पराक्रमी खेळाडू कसे घडले हे लेखकाने आपल्या अनोख्या शैलीतून उल्लेखनीय कार्य केले आहे.असे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वरी,तुकारामगाथा,भारता