नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ५५५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३ हजार १५० रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४८१ रुग्णांची वाढ झाली असून १८६ रुग्ण बरे झाले तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ९६, चांदवड २५, सिन्नर ८४, दिंडोरी ५१, निफाड १३०, देवळा १४, नांदगांव ११२, येवला ३९, त्र्यंबकेश्वर २०, सुरगाणा ०८, पेठ ००, कळवण १७, बागलाण ३१, इगतपुरी २३, मालेगांव ग्रामीण ४३ असे एकूण ६९३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार २२८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १९६ तर जिल्ह्याबाहेरील ३३ असे एकूण ३ हजार १५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख २२ हजार ८१० रुग्ण आढळून आले आहेत.