नाशिक : अशक्तपणामुळे जिल्हा रूग्णालयात दाखल केलेल्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
बापुराव अमृता दांडगे (५० बंदी क्र.सी.१०१९८) असे मृत कैद्याचे नाव आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असतांना त्यास अशक्तपणा जाणवू लागल्याने जेलप्रशासनाच्या वतीने २९ जानेवारी रोजी त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी (दि.१०) उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.
…