नाशिक – गंगापूर धरणालगत एका खासगी रिसॉर्टवर सुरु असलेल्या अवैध हुक्का पार्टीवर दिल्हा पोलिस अधिक्षकांनी स्वतः अचानक छापा टाकून मोठी कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांनी जागा मालक गौरव मोले सह १७ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणा-या ३८ तरुण – तरुणींसह आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे या छाप्यात हुक्क्याचे साहित्य, सुगंधीत तंबाखुजन्य पदार्त असा दोन लाख किंमतीचा साठा जप्त केला आहे.
शनिवारी मध्यरात्री गंगापूर धरणालगत असलेल्या गंमत जमंत पिकनिक स्पॅाटमागे सावरगाव शिवारात हॅाटेल इलाका रिसोर्टवर लोकांची गर्दी जमा असून अवैधरित्या हुक्का पार्टी सुरु असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्वत. पोलिस पथकासह इलाका रिसोर्ट येथे हा छापा टाकला. सदर ठिकाणी सुरु असलेल्या हुक्का पार्टीत जागा मालक गौरव मौले व त्याचे साथीदार संगणमताने अनाधिकृतपणे ग्राहकांना मानवी शरिरास घातक असा हुक्का साहित्य साधनांसह पुरवित होते. त्यामुळे मालकासंह १७ जणांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम सह सिगारेट व तंबाखु उत्पादने सुधारित अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणा-या ३८ तरुण – तरुणींसह आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.