नाशिक : शहरतात चोरून लपून सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या दहा दिवसात गुन्हे शाखेच्या युनीट एकने केलेल्या सात धडाकेबाज कारवायांमध्ये तब्बल ६० संशयितांना गजाआड केले असून सुमारे ९० हजार २७० रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
शहरातील अवैध धंध्यावर कारवायांसाठी नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट एकने ९ मार्चला एकाच दिवशी गंगापूर व भद्राकाली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करून १६ जणांना अटक केली. यात गंगापूर भागातील ७ जणांना अटक करीत त्यांच्याकडून १९ हजार ४६० रुपयांचा मद्देमाल जप्त केला. तर भद्रकाली परीसरातील ९ जणांकडून ८ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्याच दिवशी १० मार्चला म्हसरुळ हद्दीून ९ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १८ हजार ४५४ रुपयांचा , ११ मार्चला आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ९ जणांकडून १२ हजार ५९०रुपयांचा , १३ मार्चला पुन्हा भद्राकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ जणांवर कारवाई करताना त्यांच्या ७ हजार ६० रुपये व पंचवटीत १२ जणांना १७ हजार ४० रुपयांच्या मुद्देमालासह पोलीसांनी अटक केले.त्याचप्रमाणे गुरुवारी (दि.१८) गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत सात जणांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ६ हजार ८६० रुपयांच्या मुद्देमालासह जुगाराचे साहित्य जप्त केले.