अल्पवयीन मुलीस डांबून ठेवत अत्याचार
नाशिकः जीवे मारण्याची धमकी देत युवतीस घरात डांबून ठेवत वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील गांगापाडळी परिसरात रविवार (दि.९) ते सोमवार (दि.१०) दरम्यान घडली.
रविंद्र अरूण साळवे (१९, रा. नाशिक, पुर्ण माहिती नाही) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार संशयिताने घरात घुसून पीडितेस मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत तीच्यावर बळजबरीने अत्याचार केले तसेच त्याच्या नवीन घरात डांबून ठेवून अत्याचार केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक गोसावी हे करत आहेत.
….