नाशिक – महाविद्यालय व महाविद्यालयांची वसतीगृह त्वरीत सुरू करावी व त्यात सोबत बस थांबा खानावळी इत्यादी विद्यार्थी गरजेची ठिकाणे सुरू करावी अशा मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मंगळवारी राज्यव्यापी महाविद्यालय उघडा आंदोलन केले.नाशिकमध्येही बीवायके महाविद्यालय, केटीएचएम महाविद्यालय आणि केके वाघ महाविद्यालय ओझर या तीन ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य मार्फत शिक्षण मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी महाविद्यालय परिसरात “सुरु करा! सुरु करा! महाविद्यालय सुरू करा!” , “शिक्षण मंत्री दौर्यावर विद्यार्थी मात्र वाऱ्यावर ” अशा घोषणा घेऊन विद्यार्थ्यांनी आक्रोश नोंदवला. यावेळी प्रदेश सहमंत्री विराज भामरे, जिल्हा संयोजक अथर्व कुलकर्णी, जिल्हा सहसंयोजक ऐश्वर्या पाटील, महानगर मंत्री सिद्धेश खैरनार, राकेश साळुंखे , महानगर सहमंत्री सौरभ धोत्रे , ओम मालुंजकर, दिव्या सिंग, श्रेयस पारनेरकर, हर्षदा कदम, ऋषिकेश सिरसाट, आद्वैत जोशी, कौस्तुभ पिल्ले, संस्कार सोनवणे , संस्कृती शेळके, वैष्णवी शिरसाट, सचिन शितोळे, पायल छाजेड, तपस्वी गोटरणे, ऋची अग्रवाल आदी विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.