नाशिक – महावितरणकडून येत्या शनिवारी २८ रोजी अंबड औद्योगिक वसाहतीतील बऱ्याच भागात वीजपुरवठा सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील ३३ केव्हीच्या तीन फीडर वरही कामे केली जाणार असून यामुळे नीरज, सनी, नीलचंद्रा, एसडी ऑटो, झायलॉग, आयसोवोल्टा आणि सारूळ येथील २२ केव्ही फीडरवर याचा परिणाम जाणवणार आहे. वसाहतीतील जी , जे आणि एफ सेक्टरमधील प्लॉट क्र . डब्ल्यू ११२ ते डब्ल्यू १५६, इ सेक्टरमधील ६८,६९, ७४, इ -९५ ते इ १०५, इ -७ ते १३, एच सेक्टरमधील १५४ ते १५६, एस १०५ ते १०७, एस २३/१ ते २३/३ गंगामाई कॉम्प्लेक्स , पीएपी ४ ते ४१ सिमेन्सजवळ पीएपी प्लॉट्स , किर्लोस्कर , सिटीआर आणि इनोव्हा रबर या परिसरात यामुळे वीजपुरवठा खंडित राहणार आहे. औद्योगिक महावितरणकडून शनिवारी बहुतांश उद्योगांना साप्ताहिक सुट्टी असल्या कारणाने देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातात. मात्र कोरोना महामारीमुळे सर्वात जास्त फटका हा उद्योग व्यवसाय क्षेत्राला बसला आहे म्हणून सततच्या पाठपुराव्याने काही महिन्यांपासून शनिवारी देखील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. पण काही दिवसांपासून देखभाल व दुरुस्तीची कामे प्रलंबित असल्यामुळे वीजपुरवठ्यात अनियमितता येत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी येत्या शनिवारी सकाळपासून वीजपुरवठा बंद राहणार आहे.चार दिवस आधीच ही पूर्वसूचना मिळाल्यामुळे उद्योजकांना त्यांची कामे पूर्वनियोजित पद्धतीने करता येणार असल्याचे समजते . औद्योगिक वसाहतीतील अनियमित वीजपुरवठा संदर्भात महावितरण कार्यालयाशी संवाद साधण्यासाठी निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव , मानद सरचिटणीस तुषार चव्हाण , निमा पावर कमिटीचे चेअरमन रावसाहेब रकिबे उपस्थित होते.