नाशिक : चोरीच्या उद्देशाने वेगवेगळया ठिकाणी अंधारात लपून बसलेल्या तिघांना गस्तीवरील पोलीसांनी हुडकून काढले असून, त्यांच्या ताब्यातून घरफोडीचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तौफिक नासीर शेख (१९ रा.अजमेरी चौक,नाईकवाडीपुरा),फैजल सलीम शेख (२४ रा.मिरा दातार दर्गा जवळ) व फरहान उर्फ दहशत कलीम शेख (रा.आयशा पार्क अजमेरी चौक) असे अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. तौफिक शेख आणि पैजल शेख हे बुधवारी (दि.३०) काठेगल्लीतील बनकर मळा येथे एका वडाच्या झाडामागे स्व:ताचे अस्तित्व लपवतांना मिळून आले. तर फरहान उर्फ दहशत शेख हा तिगरानिया रोड वरील काशी माळी मंगल कार्यालय परिसरात घरफोडी अथवा चोरी करण्याच्या उद्देशाने अंधारात लपून बसला होता. गस्ती पथकाने तिघांना हुडकून काढले असून त्यांच्या ताब्यातून चोरी करण्यासाठी लागणारे वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी हवालदार गोरख साळूंखे व कय्युम अली सय्यद यांच्या तक्रारीवरून वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलीस नाईक जाधव आणि शेख करीत आहेत.
…….
अरिंगळे मळयात तडीपार जेरबंद
नाशिक : शहर आणि जिह्यातून हद्दपार केलेले असतांना राजरोसपणे वावरणा-या तडीपार गुंडास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई एकलहरा रोडवरील अरिंगळे मळा भागात करण्यात आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू बटवा बाबर (२२ रा.अरिंगळेमळा) असे अटक केलेल्या संशयीत तडीपार गुंडाचे नाव आहे. बाबर याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमिवर त्यास गेल्या आॅगष्ट महिन्यात शहर पोलीसांनी तडीपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती नााशिकरोड पोलीसांना मिळाली होती. मंगळवारी (दि.२९) रात्री पोलीस पथकाने त्याच्या घरी छापा टाकला असता तो घरात मिळून आला. याप्रकरणी शिपाई केतन कोकाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.

……