नाशिक – देवळाली कॅम्प येथून किसान रेल्वेने नाशिकमधील शेतकऱ्यांचा भाजीपाला मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेशात रवाना केला जात आहे. आता पर्यंत ९६१ टन भाजीपाल्याची वाहतूक करण्यात आली आहे.
ऑगस्टमध्ये किसान रेल्वेचा शुभारंभ करण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांकडून सुमारे नऊशे टन भाजीपाला (नाशवंत वस्तू) उत्तर प्रदेश आणि बिहारमधील विविध ठिकाणी नेल्या आहेत. त्या ट्रेनचे एक निश्चित वेळापत्रक असते.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि बिहारमधील दानापूर येथे भाजीपाला पाठविणाऱ्या शेतकरी माहिला शर्मिला पेखले म्हणाल्या की, सुरुवातीला सदर रेल्वे आठवड्यातून एक वेळ सुरू केली होती, परंतु नंतर आठवड्यातून तीन वेळा धावते. त्यामुळे शेतकरी आपला कृषी उत्पन्न यूपी आणि बिहारला पाठवू शकले आणि चांगले उत्पन्न मिळवू शकले.
त्याशिवाय नाशवंत वस्तूव्यतिरिक्त इतर ५०६.३ टन पार्सलही ट्रेनमध्ये पाठविण्यात आले आहे यातून रेल्वेने आतापर्यंत ५७.९ लाख रुपयांची कमाई केली आहे. भाजीपाला, कांदा, डाळिंबाची लागवड करणारे नाशिक आणि मनमाड येथील शेतकरी ही रेल्वे वरदान ठरत आहेत. भुसावळ ते जबलपूर, सतना, प्रयागराज, दिनदयाल स्टेशन, बक्सर, दानापूर आणि मुजफ्फरपूर या रेल्वेमार्गाच्या क्षमतेनुसार छोट्या छोट्या ठिकाणाहून माल पाठवण्यास सक्षम असल्याचा शेतकऱ्यांना आनंद वाटत आहे.