नाशिक – ओझर येथील विमानतळावरुन नवी दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांसाठी स्पाईसजेटने विमानसेवा सुरू केली आहे. या सेवेबरोबरच नाशिकला आणखी शहरांशी कनेक्ट करण्यासाठी स्पाईसजेटने पुढाकार घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळेच दिल्ली, हैदराबाद व बंगळुरूमार्गे थेट दुबई, कोलकाता, कोच्ची, झारसुगुडा, चेन्नई व पाटणा या शहरांशी कनेक्ट होता येणार आहे. त्यामुळे नाशिकच्या उद्योग, व्यवसाय व पर्यटन क्षेत्राला वाव मिळणार आहे.