नाशिक – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात हे नाशिकहून काल दिल्ली येथे विमानाने रवाना झाले आहे. ते प्रदेाशाध्यक्षपद सोडणार असल्याची चर्चा आहे. अचानक ते नाशिकला आले व स्पाईसजेटच्या विमानाने दिल्लीला रवाना झाल्यामुळे राजकीय वर्तूळात चर्चेला उधान आले आहे.
मंत्री व पक्षसंघटनेचे प्रमुख पद असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलावे यासाठी काही नेत्यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीला सांगितले आहे. त्यामुळे थोरात यांनीच आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. याअगोदरही त्यांनी हे पद सोडण्याचा आग्रह धरला होता. पण, त्यांना नकार मिळाला. सोमवारी ते दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेतील. त्यात ते आपला निर्णय सांगणार असल्याचे कळते. या पदासाठी राजीव सातव, अमित देशमुख या तरुण नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्याचबरोबर नाना पटोले, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकुर यांची नावेही घेतली जात आहे.