देवळाली कॅम्प :- देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेत नाशिक तालुक्यात मेगा लेदर फुटवेअर अँड ऍक्सेसरीज क्लस्टर योजना राबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. त्यानंतर मुंडे यांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. गुरुवारी आमदार सरोज अहिरे यांनी मुंबई येथे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नाशिक मध्ये हे क्लस्टर सुरु झाल्यास चर्मकार बांधवाचा विकास होण्यास व जिल्ह्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील असे सांगितले.