संमेलनअध्यक्षपदी लेखिका सुमती पवार यांची निवड ; उदघाटक डॉ. विजया वाड…
——–
नाशिक- साहित्य सखी, संस्थेच्या नाशिक शाखेतर्फे रविवार २८ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. स्री मंडळ हॉल ,वेद मंदिराजवळ, तिडके कॉलनी, नाशिक येथे प्रमुख अतिथी, उदघाटक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजया वाड यांच्या उपस्थितीत हे संमेलन संपन्न होणार आहे. तसेच संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुमती पवार यांची निवड सर्वानुमते झाली आहे.
सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात दोन सत्रात संमेलन होईल. यात प्रथम सत्रात कथाकथन आणि पुस्तक प्रकाशन व मान्यवर अतिथींची मनोगते होतील. द्वितीय सत्रात बहारदार कवयित्री संमेलन साहित्यिक अॅड. मिलन खोहर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच सहभागी प्रत्येक कवयित्रीला आकर्षक सन्मान चिन्ह आणि पुस्तक भेट देवून यथोचित सन्मान केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या सहभागी कवयित्रीला पुस्तक प्रकाशित करावयाचे असल्यास प्रकाशन पूर्व नोंदणी व कवयित्री संमेलनासाठीची नोंदणी अलका कुलकर्णी – 9850253351 यांचेकडे करावी. साहित्य संमेलनात आपला सहभाग नोंदवण्यासाठी नोंदणीची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२१असून या मुक्तमंचात महाराष्ट्रभरातून नोंदणी सुरू झाली आहे. या सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने महिला साहित्यिकांनी, कवयित्रींनी सहभागी व्हावे. असे आवाहन साहित्यसखीच्या पदाधिकारी प्रा.प्रतिभा जाधव, अलका कुलकर्णी व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.