नाशिक – मराठा समाजाच्या संघटनेच्यावतीने मराठा समाज युवकांची एकत्रित बैठक रविवारी (४ ऑक्टोबर) येथे झाली. या बैठकीत समाजासाठी तातडीने करण्यात येणाऱ्या साहाय्यासाठी चर्चा झाली,तसेच पुढे सर्व समाज संघटित करन्यासाठी अभियान उभारण्यात येईल,त्यांचे माध्यमातून सर्वाना सोबत घेऊन जिल्ह्यात भव्य लढा उभारला जाईल,समाजाच्या तळागाळात असलेल्या मुद्द्यांना वाचा फोडण्यासाठी शहरात मराठा समाज सहाय्यता मार्गदर्शन कक्षा”सुरू करण्याचे ठरवण्यात आले.
यावेळी मराठा समाजाचा जमा असलेला निधी खर्च व्हावा यासाठी मागणी केली जाणार आहे,मराठा समाजाचे आंदोलने मोर्चे समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून व्हावे,गटतट,राजकारण यात अजिबात होऊ नये,समाज अडचसणीत संकटात असतांना समाजात फूट पडता कामा नये,यासोबत मराठा विद्यार्थ्यांसाठी फि बाबत सक्ती अडवणूक करणाऱ्या कॉलेजेस ला इशारा पत्र देण्यात येईल,प्रसंगी आंदोलन ही केले जाईल,रोजगारासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वोतोपरी झटणार असल्याचे निर्णय क्षत्रिय मराठा समाजाचे जिल्हाप्रमुख योगेश कापसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीत प्रथम छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे हार घालून पूजन करण्यात आले,
तत्पूर्वी यावेळी शहर जिल्ह्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी पाच सदस्य समिती नेमण्यात आली असून ते समितीचे पदाधिकारी नेमतील,केवळ मराठा समाजाचे ज्वलंत मुद्दे घेऊन क्षत्रिय मराठा संघटना कार्यरत राहील असे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष योगेश कापसे यांनी सांगितले.
१)जिल्ह्यातील मराठा समाजाचे प्रश्न रोजगार शिक्षण व सामाजिक अडीअडचणी मार्गी लावण्यासाठी शहरात “मराठा समाज सहाय्यता कक्ष” सुरू करण्यात येईल.त्यासाठी मराठा समाजाने जमवलेल्या निधीतून खर्च करण्यासाठी मागणी करण्यात येईल.
२)मराठा समाजाचे आंदोलन मोर्चे यासाठी जिल्ह्यातील सर्व समाजातील घटक संघटना याना सोबत घेऊन लढा उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील,
३)मराठा विद्यार्थ्यांची फि-साठी सवलतीसाठी अडवणूक होऊ नये यासाठी महाविद्यालयाना इशारा पत्र देण्यात येईल,प्रसंगी तीव्र आंदोलन ही केलं जाईल,
४)क्षत्रिय मराठा संघटना सकल मराठा समाजाचा भाग आहे, समाजासाठी एकत्रीत येऊन राजकीय व वैयक्तिक जोडे घरी ठेवून समाजाच्या हितासाठी सर्वाना सोबत घेऊन कामकाज करण्याचे यावेळी ठरवण्यात आले,
यावेळी जितेंद्र चव्हाण , शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे अध्यक्ष राम खुर्दळ गिरीश उगले पाटील हर्षल पवार,वैभव देशमुख शरद पोपटराव भोजने,शुभम पाटील, हार्दिक निगळ,मंगेश कापसे, बापू पवार,सचिन पवार, संकेत सोमवंशी,महेंद्र मगर, शुभम पडवळ,शुभम पाटील, चेतन आहेर ,व तसेच नाशिक शहरातील मराठा कार्यकर्ते उपस्थित होते.