नाशिक – राज्यातील पोलिसांच्या बदल्याचे सत्र सुरु असून जिल्ह्यात नवीन पोलीस अधिकारी लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. संग्रामसिंह निशानदार यांची नाशिकच्या गुन्हे शाखा विभागाच्या पोलीस उपायुक्त पदी बदली झाली आहे. तसेच मोहन ठाकूर यांची शहराच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बदली झाली आहे.
दीपाली खन्ना, सीताराम गणपत गायकवाड, शेख सोहेल नूरमोहम्मद यांची शहराच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राजेश दुदलवार यांची महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या सहायक संचालय पदी नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण विभागात सोमनाथ तांबे यांची निफाड उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर बदली झाली आहे. अमोल गायकवाड यांनी कळवण विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर बदली झाली आहे. अर्जुन भोसले यांची नाशिक ग्रामीण येथे उपविभाग पोलीस अधिकारी म्हणून बदली झाली आहे. चंद्रकांत खांडवी यांची मालेगाव येथे अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.