नाशिक – केंद्र सरकारच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन अँण्ड कस्टम विभागातर्फे नाशिकला राज्यातील दुसरे आंतरराष्ट्रीय कुरिअर हब बनविण्यास मान्यता दिली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रीकल्चरच्या नेत्तृत्वाखाली सर्व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी नाशिकचे जीएसटी (कस्टम) आयुक्त अविनाश थेटे यांची भेट घेऊन आंतरराष्ट्रीय कुरिअर हब संदर्भात चर्चा केली. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या हस्ते थेटे यांचा या भेटीत सत्कार केला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना जीएसटी (कस्टम) आयुक्त थेटे यांनी आंतरराष्ट्रीय कुरिअर हब होण्यासाठी नाशिकला पोषक वातावरण आहे उद्योगाबरोबरच अॅग्रीकल्चर मालालाही जागतिक बाजारपेठेत स्थान मिळविणे आणि वेळेत माल पोचविणे शक्य होणार असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय कुरिअर हब लवकरात लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
याप्रसंगी कस्टम सहआयुक्त महिपालसिंग, सहाय्यक आयुक्त आर. के. जैन आणि हॅल्कॉनचे सीईओ सुधाकर सेन यांचा सत्कार ललित बुब, सी एस. सिंग , यतीन पटेल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.