राहते घरात कुजलेल्या मृतदेह
नाशिक : राहते घरात घरमालकाचा कुजलेला मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात दुर्घंधी सुटल्याने ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. वासूदेव साधवानी (रा.सागर हेरीप्राईड अपा.सेंट फिलोमिना शाळे समोर जेलरोड) असे मृतदेह मिळालेल्या इसमाचे नाव आहे. साधवानी हे घरात एकटेच वास्तव्यास होते. मंगळवारी (दि.६) परिसरात दुर्गधी पसरल्याने नागरीकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने दरवाजा तोडला असता किचनमध्ये कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह मिळून आला. साधवानी यांच्या मृत्युचे कारण गुलदस्त्यात असून याप्रकरणी प्रकाश पाटील यांनी खबर दिल्याने मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत.
…..
जेलरोडला मोटारसायकल चोरी
नाशिक : घरासमोर पार्क केलेली मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जेलरोड भागातील दसक शिवारात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण मधुकर धनराव (रा.आकांक्षा पार्क महालक्ष्मीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ३१ मार्च रोजी धनराव यांची अॅक्टीव्हा एमएच १५ एफजे ८५५३ सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. अधिक तपास जमादार गोसावी करीत आहेत.