घोटी – नाशिकरोड, देवळाली कॅम्प येथील सराईत गुन्हेगाराला पूर्ववैमन्यस्यातून धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली आहे.याबाबत इगतपुरी पोलिसांनी पाच संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून,पाचही मारेकरी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,देवळाली कॅम्प तसेच नाशिक परिसर आपल्या गुन्हेगारीने हादरून सोडणाऱ्या संजय बबन धामणे वय ४२ या सराईत गुन्हेगाराची इगतपुरी शहरात हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.मृत संजय धामणे याचा भाऊ राजू धामणे हा सहा वर्षांपूर्वी कल्याण येथे हत्या झालेल्या डेव्हिड पॅट्रीक मॅनवेल हत्येप्रकरणी तळोजा कारागृहात आहे.त्याला तारखेला कोर्टात आणले असता मयत संजय धामणे यांचा भाचा दीपक दत्तात्रय पाटील यास संशयित आशा पॅट्रीक मॅनवेल यांनी चार संशयितांना चिथावणी देऊन कोणालाही जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.
दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी संजय धामणे हे इगतपुरीतील अँबेसिडेर हॉटेल समोर असलेल्या डाक बंगल्याजवळ जात असताना संशयित अजय पॅट्रीक मॅनवेल,सायमन उर्फ पापा पॅट्रीक मॅनवेल,अजय उर्फ टकल्या पवार,राजकुमार भारती व आशा पॅट्रीक मॅनवेल आदींनी धारदार हत्यारांची संजय धामने याची हत्या केली. दरम्यान हे पाचही संशयित फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.याबाबत अधिक तपास इगतपुरी पोलीस करीत आहेत.