नाशिकरोड- जमीन महसुलाची थकबाकी त्वरित भरावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा नोटिसा नाशिकरोड परिसरातील अनेक शेतकऱ्यांना तहसिलदारामार्फत प्राप्त झाल्याने त्रस्त झालेला शेतक-यांनी एकलहरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात सदर नोटीसांची होळी करण्यात आली, तसेच शासनाचा निषेध करण्यात आला.
नाशिकच्या तहसिलदारांनी झोपड्डीत, शेतात राहणा-्या शेतक-यांना लाखो, काहीना कोटीची रुपये सारा वसुलीचा हुकूम सोडला आहे. सात दिवसांत ही थकबाकी न भरल्यास कारवाई करण्यात येईल अशा नोटीसा पाठविण्यात आल्या. या नोटीस बघून शेतकरी त्रस्त झाले. याबाबात माजी आमदार योगेश घोलप यांनी व संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. सदरच्या नोटीसा तातडीने मागे घेण्यात घ्याव्या, रकमेमध्ये सुट मिळावी, अन्यथा शेतकर्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. असंख्य शेतकऱ्यांना कसूर दास मागणीची नोटीस या पत्राद्वारे तहसिलदाराकडून लाखो रुपये वसूली करण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या असून यातील काही शेतकऱ्यांच्या वसुलीची रक्कम प्रत्येकी सुमारे वीस लाख रूपये पेक्षा जास्त आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. तुकडा प्रकरणे व सनद इतर प्रकरणाबाबत या नोटिसा देण्यात आले आहे. शेतकरी वर्ग कोरोना महामारीमुळे त्रस्त झालेला आहे. तसेच अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे सदरच्या नोटिसा मागे घ्याव्या व शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने एकलहरा रोडवरील कृषी बाजार समितीच्या आवारात सदर नोटीसांची होळी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, व्यापारी बॅकेचे अध्यक्ष निवृत्ती आरिंगळे, आशोक खालकर, ॲड. नितीन ठाकरे, राजु देसले, आर्किटेक उन्मेश गायधनी, नगरसेवक पंडित आवारे, मनोहर कोरडे, गोरख बलकवडे, रमेश औटे,वसंत अरिगंळे, शांताराम भागवत, नामदेव बोराडे, केशव बोराडे, योगेश भोर, अरुण भोर, रामचंद्र टिळे, उत्तम कोठूळे, संजय कोठूळे, मधुकर सातपुते, धनाजी अरिंगळे,पी.बी. गायधनी, विजय अरिगळे, जगन गवळी, रामचंद्र टिळे, चंद्रभान ताजनपुरे, राजाराम धनवटे, सुकदेव भागवत, मधुकर औटे, दिनकर आढाव, कुलदिप आढाव, संगिता नेहे आदि उपस्थित होते.