नाशिक – शहरात सध्या पंचवटी, सिडको तसेच शहरातील मध्यवर्ती भागात भव्य क्रीडा संकुले असून आता नाशिक रोड भागात देखील पंपिंग स्टेशन जवळ भव्य क्रीडांगण साकारण्यात येणार आहे. प्रभाग १९ मध्ये चेहडी पंपिंग स्टेशन येथील भवानी चौकात नाशिक महानगरपालिकेकडून सुसज्ज क्रिडांगण उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.या ठिकाणी विविध खेळांची मैदाने तसेच भव्य जॉगिंग ट्रॅक करण्यासाठी महापालिकेकडून तातडीने काम करण्यात येत आहेत . त्यामुळे नाशिकरोड भागातील क्रीडाप्रेमीसाठी कबड्डी ,खो-खो या पारंपारिक खेळ सह अन्य खेळांसाठी सुसज्ज मैदान उपलब्ध होणार आहे. अद्यावत म्युझिक सिस्टिम असलेला चारशे मीटरचा जॉगिंग ट्रॅकदेखील साकारण्यात येत आहे. सदर क्रीडा संकुलाची सुविधा नाशिक रोड वासियांना लवकरच उपलब्ध होणार आहे. या मैदानावर जॉगिंग ट्रॅकच्या दोन्ही बाजूस वृक्ष लागवड करण्यात आली असून ग्रीन जीम देखील उभारण्यात आले आहे.