नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (१ सप्टेंबर) गणेश मूर्ती विसर्जन उत्सवाला गालबोट लागले. एकूण ४ जणांचा मंगळवारी सायंकाळपर्यंत पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यात नाशिक शहरातील दोन तर देवळा आणि पिंपळगाव बसवंत येथील एकाचा समावेश आहे.
देवळाली गाव येथील नरेश नागेश कोळी (वय ४०) हा व्यक्ती वालदेवी नदीत गणेश मूर्ती विसर्जन करताना बुडाला. त्याचा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तर, चेहेडी येथील युवक दारणा नदीवर विसर्जनासाठी गेला असता बुडाला.. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिस घटनास्थळी पोहचले. बुडालेल्या युवकाचे नाव अजिंक्य राजाराम गायधनी (वय २१) आहे. त्यामुळे शहरात दोन जमांचा बुडून मृत्यू झाला आहे.
देवळा तालुक्यात प्रशांत वसंत गुंजाळ (वय २८) हा युवक गणेश मूर्ती विसर्जन करताना विहीरीत बुडाल्याची घटना घडली आहे. माहिती मिळताच स्थानिक पथकाच्या माध्यमातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर, निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे रविंद्र रामदास मोरे या व्यक्तीचा कादवा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे.
या चार घटना वगळता शहरासह जिल्ह्यात शांततेत विसर्जन सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.