नाशिक – नाशिकरोडचा पाणीपुरवठा सोमवार (२५ जानेवारी) पासून सुरळीत करून त्या ठिकाणी वाढीव पाणी देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात नाशिकरोडच्या नगरसेवकांसह पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक महापौरांच्या रामायण या निवासस्थानी झाली.
यावेळी महापौरांनी सांगितले की, नाशिकरोड परिसरातील पाण्याबाबतच्या तक्रारी लक्षात घेऊन त्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे. तसेच त्या ठिकाणी असणारी पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने सोमवार दि २५ जानेवारीपासून ४ एमएलडी वाढीव पाणी पुरवठा करावा तसेच या परिसरातील व्हॉलमन यांची माहिती सर्व नगरसेवक सदस्यांना देऊन स्वच्छ पाणीपुरवठा होईल याबाबत पाणी पुरवठा विभागाने दक्षता घेण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. बैठकीस उपमहापौर भिकुबाई बागुल, सभागृह नेते सतीश सोनवणे, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, प्रा.शरद मोरे, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, पंडित आवारे, सुनील गोडसे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, ज्योती खोले, जयश्री खर्जुल, अधिक्षक अभियंता संदीप नलावडे, एस. एम.चव्हाणके, कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत, उप अभियंता राजेंद्र पालवे, जाधव, दप्तरे आदी उपस्थित होते.