नाशिक – नाशिक शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रार्दूभावामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक परिस्थिती निर्माण होऊ नये, या करीता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे त्याअनुषंगाने 31 मार्च 2021 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता,1973 चे कलक 144(1)(3) अन्वये संचारबंदी आदेश लागु केले आहेत. सदर आदेश 10 मार्च 2021 पासून जारी करण्यात आले असल्याचे पोलीस आयुक्त दिपक पांण्डेय यांनी शासकीय आदेशान्वये कळविले आहे.
कालावधीच्या आदेशाची अंमलबजावणी करतांना कार्यक्षेत्रात सार्वजनिक व खाजगी आस्थापनांचे प्रमुख यांना आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय यांनी सामाजिक अंतरासंदर्भात निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करणे बंधकारक आहे. दोन व्यक्तींमध्ये 06 फुटाचे अंतर असावे. कंन्टनमेंट झोन संदर्भातील शासनामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश उपरोक्त कालावधीत सर्व संबंधितांना बंधनकारक राहातील तसेच सार्वजनिक ठिकाणी,कामाच्या ठिकाणी व प्रवासादरम्यान नागरीकांनी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक असून उघड्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी राहील. नाशिक शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सामाजिक,राजकीय कार्यक्रम, मेळावे, जत्रा, यात्रा, ऊरूस, क्रीडा स्पर्धा व सर्व आठवडे बाजार व मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे कार्यक्रम भरविण्यास बंदी आहे. अंतविधी करिता जास्तीत जास्त २० व्यक्ती यांना मार्गदर्शक तत्वांचे यथोचित पालन करण्याच्या अधीन राहून एकत्र येण्याची मुभा आहे.
सदर आदेशपूर्ती सर्व संबंधितांना स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश पोलीस आयुक्त दिपक पांण्डेय यांनी एकतर्फी पारित केला आहे. वरीलप्रमाणे सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र रहातील, असे पोलीस आयुक्त दिपक पांण्डेय यांनी आदेशान्वये कळविले आहे.