नाशिक – नाशिकमध्ये सर्वाधिक किल्ले असूनही ते दुर्लक्षित असल्याची खंत खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी नशिक येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली. यावेळी प्राथमिक जबाबदारीने आधी किल्ल्याचे जतन केले जाणे तितकेच महत्त्वाचे असल्याचेही सांगितले.
यावेळी त्यांनी मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. पण, ईडब्ल्यूएस आरक्षण घेतल्याने समाजाला धोका निर्माण होणार नाही हे सरकारने सांगावे. ईडब्ल्यूएस सर्व खुल्या वर्गासाठी आहे ते फक्त मराठा समाजाला नाही असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी न्यायालयाकडून चांगला निर्णय अपेक्षित असल्याचेही सांगितले. दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी त्यांनी भाष्य केले. सरकारने शेतक-यांचे प्रश्न मार्गी लावावे असेही ते म्हणाले.