नाशिक – राज्य सरकारने कठोर निर्बंधांसह विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच, यासंदर्भातील नियमावलीही जाहीर केली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.
तो खालील प्रमाणे
राज्य सरकारने काढलेले आदेश आपल्या जिल्ह्यात पूर्णतः लागू करण्यात येत आहेत. तसेच यापूर्वी जिल्ह्यासाठी काढलेल्या आदेशातील या आदेशाहून अधिक कठोर असलेले निर्बंध तसेच पुढे चालू ठेवण्यात येतील.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक