रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये यांना मिळणार सर्वप्रथम कोरोना लस; सर्व तयारी पूर्ण

by India Darpan
जानेवारी 15, 2021 | 11:51 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210113 WA0006

नाशिक – कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी अंतिम उपाय म्हणून कोविड लसीकरणाची मोहिमेला शनिवारपासून (१६ जानेवारी) सुरूवात होणार असून या मोहिमेत कोरेाना काळात अविरतपणे फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या १९ हजार ५४८ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
 जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात कोविड लसीकरणाच्या अनुषंगाने पूर्व तयारीची जिल्हा टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. मांढरे बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, नाशिक आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वर्षा मिना, कळवण आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी विकास मिना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर,  महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.
पहिल्या फेरीसाठी एवढी नोंदणी
जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया, पुणे कंपनीने तयार केलेल्या ‘कोविडशिल्ड’ या लसीचे जिल्ह्याला ४३ हजार ४४० डोसेजेस प्राप्त झाली असून या लसीकरणाचा १६ जानेवारी पासून प्रत्यक्ष प्रारंभ होत आहे. कोविड लसीकरणाच्या पहिल्या फेरीत लसीकरणासाठी जिल्ह्यातून ३६ हजार १७८ हेल्थ केअर वर्करची नोंदणी करण्यात आली आहे. यातील एका व्यक्तिला  दोन डोस याप्रमाणे पहिल्या फेरीत १९ हजार ५४८ हेल्थ केअर वर्करला लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणाअंतर्गत गर्भवती महिला व स्तनदा माता यांना लसीकरण करण्यात येणार नाही. तसेच लसीकरणासाठी जिल्ह्यात १३ केंद्र निश्चित करण्यात आली असून या एका केंद्रावर एका दिवसात १ हजार ३०० डोसेजेस देण्यात येणार असून एका आठवड्यात चार दिवस लसीकरण करण्यात येणार आहे. यानुसार लसीकरणाच्या पहिल्या फेरीची प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी साधारण एक ते दीड महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे, असे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले आहे.
२४ तास अॅम्ब्युलन्स
लसीकरणाच्या प्रक्रीये दरम्यान लसीकरणानंतर अतिदक्षतेची परिस्थिती निर्माण झाल्यास पूर्व प्रत्येक केंद्रावर १०२ व १०८ या अॅम्बुलन्सची सेवा २४ तासांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अनुषंगानेच लसीकरणानंतर लाभार्थ्याला परिक्षण कालावधी दरम्यान काही विपरीत परिणाम जाणवल्यास पुढील उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालय, संदर्भसेवा रूग्णालय, एनडीएमव्हीपी मेडिकल कॉलेज नाशिक व एसएमबीटी धामणगाव या रूग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. त्याप्रमाणे जिल्हा व तालुकापातळीवर लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. लसीकरणाच्या प्रत्येक केंद्रावर सुरू असणाऱ्या लसीकरण मोहिमेची माहिती देण्यासाठी एक पर्यवेक्षक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी आणि लसीकरण प्रक्रीयेत सहभागी असलेल्या सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी व्यवस्थीतरित्या पार पाडावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
ग्रामीण भागातील व्यवस्था
लसीकरणाच्या पहिल्या फेरीत ग्रामीण भागातील सहा केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सदर केंद्रावर आवश्यकत्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून लसीकरणाच्या लाभार्थ्यांना लसीकरणा विषयीची माहिती देणारे फलक संबंधित केंद्रावर लावण्यात आले आहेत. तसेच आजपासून सुरू होणारी लसीकरणाची मोहिम यशस्वी करण्यासाठी  आवश्यक सर्व नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी बैठकीत दिली. लसीकरण केंद्रावर लसीकरणा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच अनधिकृत व्यक्ती लसीकरण केंद्रात प्रवेश करणार नाही यासाठी पोलिस यंत्रणेमार्फत आवश्यक सर्व खबरदारी घेण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी बैठकीत सांगितले.
 अशी आहेत लसीकरण केंद्र
1. जिल्हा रुग्णालय, नाशिक
2. सामान्य रुग्णालय, मालेगाव
3. उपजिल्हा रुग्णालय,कळवण
4. उपजिल्हा रुग्णालय, निफाड
5. उपजिल्हा रुग्णालय, चांदवड
6. उपजिल्हा रुग्णालय, येवला
7. इंदिरा गांधी हॉस्पिटल, नाशिक
8. शहरी आरोग्य केंद्र, नवीन बिटको, नाशिक
9. शहरी आरोग्य केंद्र, जे. डी. सी बिटको, नाशिक
10.  शहरी आरोग्य केंद्र, कॅम्प वॉर्ड मालेगाव
11. शहरी आरोग्य केंद्र, निमा 1 मालेगाव
12. शहरी आरोग्य केंद्र, रमजानपुरा मालेगाव
13. शहरी आरोग्य केंद्र सोयगाव, मालेगाव
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सह्याद्री संवाद उपक्रमांतर्गत साखर उद्योगाचे भवितव्य’ विषयावर डॉ. भोसले यांचे रविवारी व्याख्यान

Next Post

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने घेतला अखेर हा निर्णय

India Darpan

Next Post

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने घेतला अखेर हा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011