नाशिक – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी नाशिकमध्ये येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा वार्षिक योजनांचा सर्वसाधारण प्रारुप आराखडा अंतिम केला जाणार आहे. नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन भवन येथे विभागाची बैठक सकाळी ९.३० ते दुपारी १.१५ होणार आहे. यात पाचही जिल्हयांमधील वार्षिक योजनेला अंतिम मान्यता दिली जाणार आहे. या बैठकीला नाशिककचे पालकमंत्री छगन भुजबळ, अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, धुळे येथील पालकमंत्री अब्दुल सत्तार, नंदुरबारचे पालकमंत्री अॅड. के.सी. पाडवी हे उपस्थितीत राहणार आहे. त्याचप्रमाणे वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री शंभुराज देसाई सुध्दा या बैठकीला येणार आहे.