नाशिक – सर्व देशभरात कोविड -१९ या साथीच्या आजाराचा फैलाव वाढत असताना या काळात लोकांकडून घरबसल्या ऑनलाईन कार्यालयीन काम ( वर्क फार्म होम ) सुरू आहे. तसेच विद्यार्थी देखील ऑनलाईन शिक्षण घेत असल्यामुळे नाशिक शहरातील ब्रॉडबँड, इंटरनेट कनेक्शनची संख्या मे आणि सप्टेंबर दरम्यानच्या पाच महिन्यांत ३० टक्क्यांनी वाढली आहे.
ब्रॉडबँड इंटरनेट कंपन्यांच्या अहवालानुसार शहराने गेल्या पाच महिन्यांत ३० हजारांहून अधिक ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन जोडले आहेत. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) यासह ब्रॉडबँड इंटरनेट क्षेत्रातील प्रमुख शहरातील मध्यवर्ती भागात याचा वापर अधिक आहे . शासकीय सह काही खासगी कंपन्या मध्ये देखील याचा वापर वाढला आहे.
दरम्यान,सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरबसल्या आणि ऑनलाइन शिक्षणामुळे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शनची संख्या वाढली आहे. नवीन जोडण्यांचा समावेश करून, शहरात आता १.७० लाख ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन आहेत.
कोविड -१९ चा फैलाव सुरू झाल्यानंतर शहरात ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शनची मागणी वाढली आहे. बीएसएनएल, नाशिकचे महाव्यवस्थापक नितीन महाजन यांनी सांगितले की, गेल्या ५ते ७ माहिन्यात आम्ही शहरात सुमारे ९ हजारांहून अधिक ब्रॉडबँड कनेक्शन जोडले आहेत.