नाशिक – शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी गंभीर इशारा दिला होता. मात्र, दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वर चढताना दिसत असल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी काही कडक निर्णय घेतले आहेत. त्याची घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन आता कडक केले जाणार असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असे
-
-
नाशिक व मालेगावमधील संबधीत शाळा, काॅेलेज व कोचिंग क्लासेस पुढील आदेश पर्यंत बंद
-
१० वी १२ विद्यार्थ्यांसाठी शाळेत उपस्थिती राहणे एेच्छिक राहतील
-
नाशिक , निफाड, नांदगाव व मालेगाव तालुक्यातील सर्व शाळा बंद राहतील
-
-
आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी व रविवारी सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत.
-
जीम, स्विमिंग टँक किंवा मैदाने ही केवळ व्यक्तीगत सरावापुरता सुरू राहतील किंवा त्यांचा वापर करता येईल
-
खेळांच्या सर्व स्पर्धांना बंदी
-
सार्वजनिक विवाह सोहळ्यांना १५ मार्च नंतर बंदी
-
सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरू राहणार,
-
जीवनावश्यक वस्तू दुकानांना सुट
-
धार्मिक स्थळे सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच खुली राहणार,
-
सर्व आठवडे बाजार बंद राहणार
-
हॉटेल, परमिटरुम व बियर बार यांच्यावर वेळेचे निर्बंध असतील. हे सर्व सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेतच सुरू राहतील. ५० टक्के क्षमतेची अट
-
१५ मार्च पर्यंत जे नियोजत विवाह आहेत ते होऊ शकतील. मात्र, त्यांना पोलिस व स्थानिक प्रशासनाची परवानगी बंधनकारक असेल
-
सामाजिक, धार्मिक व राजकीय समारंभ आयोजित करता येणार नाही
-
भाजी मार्केट ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील