नाशिक – शहरातील पहिल्या सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) स्टेशनचे उदघाटन करण्यात आले आहे. केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते या स्टेशनचे उदघाटन झाले आहे. त्यामुळे हे स्टेशन आता नाशिककरांच्या सेवेत आले आहे. परिणामी नाशिकला हरित इंधन प्राप्त झाले असून वायू प्रदूषण कमी करण्यात मोठी मदत होणार आहे.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या राज्य सरकारच्या कंपनीतर्फे हे स्टेशन विकसित करण्यात आले आहे. नाशिक शहरातील हे पहिले सीएनजी स्टेशन आहे. नाशिक महापालिकेतर्फे लवकरच सुरू होणाऱ्या शहर बस वाहतूक सेवेत सीएनजी बसेस दाखल होणार आहेत. प्रधान यांनी एकूण ५ सीएनसी स्टेशनचे ऑनलाईनरित्या उदघाटन केले आहे. त्यात नाशिक मधील पाथर्डी फाटा येथे असलेल्या स्टेशनचाही समावेश आहे. एमएनजीएलचे आता एकूण १०० सीएनजी स्टेशन झाले आहेत. सीएनजी स्टेशनमुळे नाशिकमधील वायू प्रदूषण कमी होईल, असा विश्वास प्रधान यांनी व्यक्त केला आहे. सीएनजी हे हरित इंधन म्हणून ओळखले जाते. देशभरात आता २५०० सीएनजी स्टेशन्स झाले आहेत. येत्या ५ ते ७ वर्षात १० हजार सीएनजी स्टेशन्स आणि ५ कोटी पीएनजी कनेक्शन्स देण्याचे आमचे उद्दीष्ट असल्याचे प्रधान यांनी सांगितले आहे.
एमएनजीएल लवकरच नाशिक शहरातील घरांमध्ये पाईपद्वारे घरगुती गॅसची सुविधाही देणार आहे. त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.