नाशिक – स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र गृहमंत्रालयातर्फे जाहीर झालेल्या पोलिस पदकांमध्ये नाशिक पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात विजय पोपटराव लोंढे (पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा) यांना राष्ट्रपती पोलिस पदक तर डॉ. सिताराम शंकर कोल्हे (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट), श्याम गणपत वेताळ (सहाय्यक उपनिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण कार्यालय) आणि पांडुरंग बाबुराव कावळे (सहाय्यक उपनिरीक्षक, पी.सी.आर., नाशिक) यांना पोलिस पदक जाहीर झाले आहे.
डॉ. सिताराम शंकर कोल्हे हे मूळचे लोणी हवेली (ता.पारनेर, जि.अहमदनगर) येथील आहेत. डॉ. कोल्हे यांना २८ वर्षांच्या नोकरीच्या कालावधीत सुमारे ६०० बक्षिसे, ८५ प्रशंसापत्रे मिळाली असून पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे. डॉ. कोल्हे यांनी खून, दरोडे, आर्थिक घोटाळ्यांचे क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यांचे तपास उत्कृष्टरित्या केले आहेत. नागरी हक्क संरक्षण कार्यालय नाशिक परिक्षेत्र येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक शाम गणपत वेताळ हे मूळचे पाटणे (ता.मालेगाव, जि.नाशिक) येथील आहेत. यापुर्वी ते नाशिक ग्रामीण पोलीस दलातील वाचक शाखेत कार्यरत होते.