नाशिक – येथील ज्येष्ठ कर विधीज्ञ (सीए) रविंद्र नारायण केळकर (वय ६८) यांचे दीर्घ आजाराने आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात सार्वजनिक वाचनालयाच्या माजी पदाधिकारी प्रा. विनया, पुत्र व कन्या असा परिवार आहे. ज्या काळात (१९७३ ते ७६) सी ए होण्यासाठी ६ ते ७ वर्षे लागत त्याकाळी केळकर हे पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले होते. अनेक लघु उद्योगांचे सल्लागार, मोहाडी व अन्य देवस्थानचे सल्लागार म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. केळकर कर सल्लागार क्षेत्रातील निष्णात, अभ्यासू व प्रामाणिक व्यक्तिमत्व होते. पंचवटीतील अमरधाम मध्ये मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. नाशिक मधील वैद्यकीय क्षेत्रातील जुन्या कुटूंबियांपैकी ते एक होत. केळकर हे पेठे शाळेचे विद्यार्थी होते.