नाशिक येथे हे साहित्य संमेलन होत असताना डॉ.गोऱ्हे यांना जे दहा लक्ष रु निधी साहित्य संमेलनासाठी दिले आहे. त्यांचे साहित्य मंडळींकडून मोठ्याप्रमाणात स्वागत होत आहे. डॉ.गोऱ्हे यांना साहित्याचा खूप मोठा वारसा लाभला. यांचे अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून उरल्या कहाण्या या कथा संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे श्रेष्ठता पारितोषिक मिळाले आहे. नारीपर्व, माणूसपणाच्या वाटेवर, समाज आणि महिला, स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग, नव्या शतकासाठी महिला धोरण व अंमलबजावणी ,शाश्वत विकास ऊद्दिष्टे व स्त्री पुरुष समानता अशी १५ च्या वर काही पुस्तके त्यांनी स्वत: लिहिली आहेत व अनेक संपादित केली आहेत.
असा आहे गोऱ्हे यांचा साहित्याचा वारसा
बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गो-हे यांच्या घराण्याचा वारसा तर आई लतिकाताई गो-हे यांच्या परिवाराला कवी श्रीधर यांचा त्यांना वारसा आहे. श्रेष्ठ कवी कै. विंदा करंदीकर हे त्यांचे सासरे तर जेष्ठ लेखिका, कवियत्री कै. विजया जहागीरदार या त्यांच्या आत्या लागतात, असा हा गोऱ्हे यांचा साहित्याचा वारसा आहे. तसेच नाशिकचे आणि डॉ.गोऱ्हे यांचे खूप दृढ संबंध आहेत. त्यांचे वडील डॉ.दिवाकर गोऱ्हे याचे व गो-हे परिवाराचे मुळ गाव नाशिक असून चांदवडची रेणुका देवी हे त्यांची कुलस्वामिनी आहे.