A Trial Before Monsoon
पुणे – नैराश्याने ग्रासलेल्या आणि आत्महत्या करण्यास निघालेल्या आपल्या मुलीला वडील सकारात्मक जीवनाचा मार्ग कसा दाखवता आणि जगण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतात. ते कसे हे A Trial Before Monsoon या लघुपटाच्या कथानकचे गुपित आहे. या लघुपटाचे लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक मनमाड,नाशिक आणि नंतर पुण्यात रहाणारे शुभम संजय शेवडे हे आहेत.
शुभम शेवडे यांनी या मराठी, दर्जेदार लघुपट डॉ. मोहन आगाशे आणि तन्वी कुलकर्णी यांना घेऊन, वडील मुलगी या नात्या वर एका वेगळ्या शैलीत या लघुपटाची निर्मिती केली आहे. या लघुपटाचे नवीन तंत्रज्ञान,नवीन मांडणी नवीन कल्पना यामुळे डॉ. मोहन आगाशे अगदी भारावून गेले होते. त्यांनी पण आपल्या दमदार अभिनयाने या लघुपटाला सर्वोच्च उंची दिली आहे. तसेच झी मराठी च उत्कृष्ठ अभिनेत्रीचे पारितोषिक मिळवलेली तनवी कुलकर्णी हिने पण आपल्या दमदार अभिनयाची चुणूक या लघुपटात दाखवली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीं वंदना गुप्ते यांनी आईचा आवाज दिला आहे. या लघुपटाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपट महोत्सवात नामांकने मिळाली आहे. भारतासह अनेक देशात विविध OTT प्लॅटफॉर्मवर हा लघुपट २७ मार्चला जागतिक नाट्य दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. तसेच लवकरच एअर इंडिया,ब्रिटीश एअरवेज या आंतरराष्ट्रीय विमानात ही दिसेल या लघुपटाचे संगीत अमेरिकेतून केले आहे. हे विशेष, जाणकारांच्या मते बहुदा असा प्रयोग् मराठीत पहिल्यांदा केला गेला असावा.
या लघुपटास शंतनू बोडखे, डॉ. उमेश नागपूरकर आणि राजीव सिंग यांचे विशेष सहकार्य लाभले.
या लघुपटाची झलक (Trailer) FableCraft Motion Pictures Production Co. या वर बघण्यास मिळेल. प्रत्येकाने पाहावा असा आणि प्रत्येकाच्या जीवनात ऊर्जा आणि सकारात्मक दिशा निर्माण करणारा असा हा लघुपट आहे. अनेक नामांकित व्यक्तींनी या लघुपटा ची प्रशंसा केली आहे आणि आपले मत मांडले आहे.