नाशिक- ओडेक्स इंडिया आणि नाशिक सायकलिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत नाशिकच्या पुष्पा सिंग यांनी `सुपर रँडोनेअर सायकलिस्ट` हा मानाचा किताब पटकावला आहे. ही स्पर्धा चार टप्प्यांमध्ये घेतली जाते. २०० किमी ३०० किमी ४०० किमी व ६०० किमी हे चारही टप्पे यशस्वीरित्या व वेळेत पूर्ण करणा-या स्पर्धकाला हा पुरस्कार दिला जातो.
अशी असते स्पर्धा
चार टप्प्यांमध्ये असलेल्या या स्पर्धेत स्पर्धकांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध किलोमीटर अंतरावर आंतरावर चार पॉईंट असतात. या पॉईंटवर स्पर्धक पोहोचल्यानंतर येथील नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या निरीक्षक तर्फे स्पर्धकाची कंट्री व वेळ म्हणजेच स्टॅम्पिंग केले जाते. अशा रीतीने स्पर्धक सर्व टप्पे पूर्ण करून किती वेळात मूळ ठिकाणी पोहोचतो याची नोंद केली जाते. या चार टप्प्यातील दोनशे किलोमीटर चा पहिला टप्पा हा १३ तासांचा असतो. दुसरा तीनशे किलोमीटरचा टप्पा हा २० तासांचा असतो. चारशे किलोमीटरचा २७ तास तर सहाशे किलोमीटर ४०तास असा कालावधी असतो.
पुष्पा सिंगने अशी जिंकली स्पर्धा
पुष्पा सिंग यांनी हे सर्व टप्पे वेळेत पार केले ६०० किलोमीटरचे अंतर साठी नाशिकच्या पपया नर्सरी पासून सुरुवात झाली. ती धुळे पॉईंट पर्यंत तेथून परत नाशिक त्यानंतर नाशिक वरून इगतपुरी नाशिक परत त्यानंतर नाशिक घारगाव संगमनेर नाशिक परत असा या स्पर्धेचा मार्ग होता. २० फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी सहा वाजता पपया नर्सरी येथून या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये एकूण पंधरा स्पर्धक होते तर पुष्पा सिंग या एकमेव महिला स्पर्धक असून देखील त्यांनी बाजी मारली.
या आधी स्पर्धा जिंकली
याआधी देखील पुष्पा सिंग यांनी वुमन्स एम्पॉवरमेंट १३००० किलोमीटरची सायकल स्पर्धा जिंकली आहे. यापुढे मुंबई-गोवा सायकल स्पर्धेत सहभाग घेण्याचा त्यांचा मानस आहे नवीन स्पर्धकांना मार्गदर्शन करण्याचाही त्यांचा मानस आहे. अधिकाधिक मुली व महिला स्पर्धकांनी सायकलिस्ट स्पर्धांमध्ये भाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. स्पर्धेच्या यशस्वीते प्रसंगी पुष्पा सिंग यांना नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या सचिव डॉ. मनीषा रौंदळ गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड विजेते सायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन रामदास सोनवणे चंद्रकांत नायक योगाचार्य उल्हास कुलकर्णी सर साधना दुसाने माधुरी गडाख आदी मान्यवर या सर्वांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.