नाशिक – अंतराळ तंत्रज्ञानाचा मानवतेच्या कल्याणासाठी वापर करण्याच्या उद्दिष्टाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने जगभर दर वर्षी ४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर “जागतिक अंतराळ सप्ताह” साजरा केला जातो. नॅशनल स्पेस सोसायटी (युएसए) – नाशिक शाखेने ह्या वर्षी जागतिक अंतराळ सप्ताह – २०२० व्यापक प्रमाणावर सर्वसामान्य नागरीक व विद्यार्थ्यांमधे अंतराळ क्षेत्राविषयी व्याप्ती, माहिती, वाव व संधि ह्याविषयी जागृती व ज्ञानसंवर्धन करण्याच्या उद्दिष्टाने हा सप्ताह साजरा करणार आहे.या सप्ताहात विविध सादरीकरणांव्दारे समाजामध्ये याचा प्रसार व प्रचार होऊन तरुणांना या विशाल क्षेत्राचा परिचय व्हावा हा उद्देश यात ठेवण्यात आलेला आहे.
असे असेल कार्यक्रमांचे स्वरुप –
यावर्षी कोविड -१९ साथीच्या परिस्थितीमुळे संपूर्ण आठवडाभर हा कार्यक्रम ईंटरनेट द्वारे ऑनलाईन झूम प्लॅटफॉर्मवर आणि “NSS – Nashik India Chapter” या युट्युब चॅनेलवर लाइव्ह आयोजित केला जाणार आहे.
सादरीकरणाचे विषय
इस्रोच्या विद्यमान व भविष्यातील मोहिमा, अंतराळ सौर ऊर्जा, चंद्र व मंगळ ग्रहावर मानवी वस्ती, अंतराळ पर्यटन, अंतराळातील शेती, अंतराळातील वाहतुक, विद्द्यार्थ्यांसाठी अंतराळ तंत्रज्ञानातील भविष्यातील संधी इत्यादी. सादरीकरण करणारे वक्ते ईस्रो, नासा आणि एनएसएस चे त्यांच्या क्षेत्रातील वरीष्ठ तज्ञ शास्त्रज्ञ आहेत.
कार्यक्रमाच्या वेळा –
- ४ ऑक्टोबर, रविवार, सकाळी ११ ते १२.३० वाजता,
वक्ते – डॉ. अण्णादुराई, ईस्रोच्या सटेलाईट सेंटरचे माजी डायरेक्टर
- १० ऑक्टोबर, शनिवार, सकाळी ११ ते १२.३० वाजता,
वक्ते – श्री. किरण कुमार, ईस्रोचे माजी चेअरमन
- ५ ते ९ ऑक्टोबर २०२० दररोज संध्याकाळी ६.३० ते ८.०० वाजता,
वक्ते – अमेरीकेतील नासा या संस्थेचे ख्यातनाम शास्त्रज्ञ.
दररोज कार्यक्रमांत सामील होण्यासाठीची लिंक विविध माध्यमांद्वारे पाठवली जाईल. तरी सगळ्यांनी या सुवर्ण संधीचा जरुर लाभ घ्यावा. असे आवाहन नॅशनल स्पेस सोसायटी (युएसए) – नाशिक शाखेचे अध्यक्ष अविनाश शिरोडे, प्रा. डॅा. अोमप्रकाश कुलकर्णी, खजिनदार विजय बाविस्कर यांनी केले आहे.