मंगळवार, जुलै 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या कुपोषणप्रश्नी राज्यपालांकडून चिंता

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 6, 2020 | 4:43 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
governor meeting 1140x570 1

मुंबई – राज्यातील गडचिरोली, नंदुरबार, वाशिम, जळगाव व नाशिक जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण तुलनेत अधिक आहे. यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिंता व्यक्त केली. अति तीव्र कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनातर्फे केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची राज्यपालांनी यावेळी माहिती घेतली. 

 महिलांच्या तसेच बालकांच्या सक्षमीकरणाबाबत राष्ट्रपती व पंतप्रधान विशेष आग्रही आहेत. यास्तव महिला व बाल कल्याण विभागाने आपल्या विविध राज्यस्तरीय तसेच केंद्र सहाय्यित योजनांचे प्रभावी कार्यान्वयन करून देशापुढे आदर्श निर्माण करावा, अशी सूचना कोश्यारी यांनी आज येथे केली.

 

महिला सुरक्षा, पोषण आहार व आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना अतिशय चांगल्या आहेत, मात्र योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी अधिकाऱ्यांनी अधून मधून प्रत्यक्ष भेट देऊन देखरेख करावी, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

राज्यांतर्गत महिलांची मानवी तस्करी तसेच राज्यातील परप्रांतीय मजुरांच्या मुलांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, याबाबत १५ दिवसांत आपणांस माहिती देण्याच्या सूचना राज्यपालांनी यावेळी दिल्या.

राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे मंगळवारी (दि. ६) राजभवन येथे राज्यपालांपुढे विविध योजनांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले त्यावेळी राज्यपालांनी विभागाला सदर निर्देश दिले.

बेटी बचाओ योजनेचा आढावा घेताना राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये स्त्री पुरुष प्रमाण २००१ च्या तुलनेत सुधारत आहे याबद्दल समाधान व्यक्त करताना बुलढाणा, सातारा यांसारख्या काही जिल्ह्यात स्त्री पुरुष गुणोत्तर वर्षानुगणिक लक्षणीयरित्या का बदलत आहे याचा विभागाने साकल्याने अभ्यास करावा अशीही सूचना राज्यपालांनी केली.

राज्यातील अतितीव्र कुपोषणाचे प्रमाण २०१६ तुलनेत कमी झाले आहे. अमृत आहार योजनेअंतर्गत महिला व बालकांना भोजन आहार तसेच अंडी व केळी देण्यात येत असल्याचे महिला व बाल कल्याण विभागाच्या सचिव इद्झेस कुंदन यांनी यावेळी सांगितले.

पोषण अभियानात केंद्र शासन प्रणित कार्यक्रमात राज्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याचे एकत्रित बाल विकास प्रकल्पाच्या संचालिका इंद्रा मालो यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सचिव सीमा व्यास, महिला व बालकल्याण आयुक्त डॉ हृषिकेश यशोद, माविमच्या अध्यक्षा श्रद्धा जोशी, बाल हक्क आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ मंजुषा कुलकर्णी व इतर अधिकारी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होणार; उद्योगमंत्र्यांची ग्वाही

Next Post

परदेशी व्यापा-याकडून कृषी व्यापा-याची ५० लाखांची फसवणूक, रक्कम देण्यास टाळाटाळ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20201006 WA0022

परदेशी व्यापा-याकडून कृषी व्यापा-याची ५० लाखांची फसवणूक, रक्कम देण्यास टाळाटाळ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

modi 111

पंतप्रधानांनी जगदीप धनखड यांना दिल्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा…

जुलै 22, 2025
DCM 2 1140x570 1 e1753180793322

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांची नाराजी….

जुलै 22, 2025
crime1

चोरीस गेलेल्या मोबाईलचा गैरवापर….फोन पेच्या माध्यमातून ३६ हजाराची रोकड घेतली परस्पर काढून

जुलै 22, 2025
Untitled 45

मंत्री कोकाटेंच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित पवार यांनी केला दुसरा व्हिडिओ पोस्ट…नेमकं काय आहे

जुलै 22, 2025
Manikrao Kokate 2 1024x512 1

ऑनलाईन रमी खेळतांनाच व्हिडिओ आणि राजीनामा?…कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेतून दिले हे उत्तर

जुलै 22, 2025
IMG 20250721 WA0533 1

हाय्रॉक्स दिल्ली २०२५ मध्ये ‘स्ट्रायकींग स्ट्राइडर्स नाशिक’चे वर्चस्व…अनेक स्पर्धांत मिळवले गौरवप्राप्त स्थान…

जुलै 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011