नाशिक – अयोध्येत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भुमीपूजन होत आहे. त्या पार्श्वभुमीवर नाशिकमध्ये आमदार सीमाताई हिरे यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत माजी आमदार निशीगंधाताई मोगल, राजाभाऊ मोगल, बाबा फडके, डॉ. झुंबर भंदुरे, दादा रत्नपारखी, रमेश गायधनी, राजाभाऊ गुजराथी, गोविंदराव यार्दी, बन्सी जोशी, दिलीपराव क्षीरसागर, अनिल चांदवडकर, लालचंद टाटीया, नाना नेऊरगांवकर, संजय तुकाराम कुलकर्णी, मदन नामदेव भंदुरे, सुधाकर नामदेव भंदुरे, सौ. पुष्पावती झुंबर भंदुरे या कारसेवकांच्या निवासस्थानी जावून सत्कार केला. यावेळी सर्व कारसवेकांना प्रभु रामचंद्र व राममंदिराची प्रतिकृती असलेले स्मृतीचिन्ह फेसमास्क देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार सीमाताई हिरे, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, महेशजी हिरे, अनिल चांदवडकर, राजेंद्र गिते, संजय सोनजे, सुशिल नाईक आदि उपस्थित होते.