हर्षल भट, नाशिक
मोबाईल नंबरच्या दहा आकडी क्रमांकाविषयी सर्वांना कायम उत्सुकता असते. मोबाईल नंबर दहा आकड्यांचाचं असण्यामागे असणारे खरे कारण उजेडात आले आहे. प्रसिद्ध गणिततज्ज्ञ कापरेकर गुरुजी यांच्या गणिती पद्धतीवरून मोबाईल क्रमांकासाठी दहा आकडे नक्की करण्यात आले आहेत. तशी माहिती प्रसिद्ध गणित तज्ज्ञ प्रा. दिलीप गोडखिंडीकर यांनी दिली आहे.
नोकिया कंपनीतर्फे मोबाईलची निर्मित करतांना सुरुवातीच्या काळात यासबंधी खुलासा करण्यात आला होता. मोबाईल क्रमांक किती आकड्यांचा असावा यासाठी नोकिया कंपनीतर्फे कापरेकर गुरुजी गणिती पद्धतीची मदत घेण्यात आली होती. गणिततज्ञ प्रा. दिलीप गोडखिंडीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘नोकिया कंपनीच्या सुरवातीच्या काळात मोबाईल नंबर किती आकड्यांचा असावा यासाठी कंपनीच्या तज्ञ मंडळींनी कापरेकर गुरुजींच्या गणिती पद्धतीचा आधार घेतला होता, त्यानुसार दहा आकडी क्रमांक नक्की करण्यात आले’ असे प्रा. गोडखिंडीकर म्हणाले. त्याचप्रमाणे सुमारे पंधरा वर्ष आधी कापरेकर गणितीचा अनोखा नमुना मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला समजला. त्यांच्या गणिती पद्धतीवर आधारित संशोधन आले. त्यांच्या गणितातील अभ्यासामुळे निरनिराळ्या संख्या पद्धती समोर आल्या आहेत. कापरेकर गुरुजींचा जन्म महाराष्ट्रातील डहाणू येथे १७ जानेवारी १९०५ रोजी झाला. जून १९३० रोजी नाशिकच्या देवळाली येथील झोराष्ट्रीयन रेसिडेन्शियल स्कुल येथे शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. नंतर १९४६ मध्ये देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट हायस्कुलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. कापरेकर गुरुजींच्या प्रसिद्ध ‘कापरेकर संख्ये’च्या आधारे नोकिया कंपनीने मोबाईलच्या आकड्यांची संख्या निश्चित केल्याने नाशिकरांसाठी हि अभिमानाची बाब आहे.
—
नोकिया मोबाईल कंपनीतर्फे सुमारे पंधरा वर्षांपूर्वी कापरेकर गुरुजींच्या संख्या प्रणालीचा आधार घेऊन दहा आकडी क्रमांक निश्चित करण्यात आला. कापरेकर गुरुजीच्या अंक पद्धती, तसेच संख्या पद्धत यांच्या आधारे मोबाईलसाठी दहा आकडी क्रमांक नक्की केले.
– प्रा. दिलीप गोडखिंडीकर, गणिततज्ज्ञ
—
कापरेकर गुरुजींविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?p=7447