पिंपळगाव बसवंत: कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे जग पुन्हा भीतीच्या छायाखाली येत असले तरी भारतातील द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातुन आत्तापर्यंत उत्तमप्रतिच्या दर्जेदार ५० हजारांहुन अधिकन मेट्रिक टन द्राक्षे निर्विघ्न विदेशवारीला पोहचले आहे. द्राक्ष विक्रीसाठी जागतिक बाजार पेठेचे केंद्र असलेल्या युरोप, ऑस्ट्रेलिया, इटली, नेदरलँड, श्रीलंका, बांगलादेश, तुर्कस्तान, सौदीअरेबिया, गल्फ, पाकिस्तान, आदी विदेशासह स्थानिक राज्यात भारतीय द्राक्षांची निर्यात यंदाच्या हंगामात सुरळीत सुरू आहे. तर ब्रिटन, चीन, व्यूहान सारख्या मोठ्या देशात द्राक्षांची खरेदी विक्री लॉकडाऊन शिथिल न झाल्याने अंशतः बंद व मागणी कमी झाल्याने ठप्पच असल्याने नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी कोरोनाच्या अफवांवर विश्वास न ठेवता, घाबरून न जाता यंदाच्या हंगामात निर्भयपणे द्राक्षांच्या खरेदी विक्री करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
निर्यातक्षम द्राक्ष पिकविनाऱ्या निफाडची ख्याती सातासमुद्रापार पोहचली आहे. निर्यातक्षम द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जाणारा व कृषी वैभवाची नांदी जपणाऱ्या निफाड तालुक्यात द्राक्ष हंगामास जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून प्रारंभ होत एप्रिल मे अखेरीस द्राक्ष हंगाम आटोपता येतो, मात्र सुरवातीच्या २ महिन्यामध्ये या द्राक्षना गोडवा कमी असल्यामुळे साधारणतः या काळातील द्राक्ष हे निर्यात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तालुक्यातील द्राक्ष हे संपूर्ण देशभर व विदेशात सुद्धा निर्यात होत असल्यामुळे येथील द्राक्ष बाजारपेठेत येण्याची उत्सुकता ग्राहकांना लागलेली असते.
गेल्या काही महिन्यांपासून मंदावलेली कोरोना बधितांची संख्या नाशिक जिल्ह्यात काही अंशी वाढत असल्याने नाशिकच्या द्राक्षांना मात्र अपेक्षेप्रमाणे दर मिळत नसल्याने शेतकरी नाराजीचा सुरू पहावयास मिळत आहे. यामध्ये शरद काळी – जम्बो, माणिक चमन, थॉमसन, सुपर सोनाका या जातीचे द्राक्ष सध्या बाजारपेठ उपलब्ध होत असून याचे दर सुद्धा या द्राक्षांच्या क्षमतेनुसार मिळत आहे. निर्यातक्षम द्राक्षांना ९० ते १२० रुपये प्रति किलो प्रमाणे मात्र कोरोना व लॉकडाउन धास्तीने हाच दर ७० ते ९० पर्यंत येऊन ठेपला आहे. तर तर सामान्य बाजारपेठतील द्राक्षांना थॉमसन ३५ ते ४०, सोनाका ५० ते ६०, माणिकचमन ६०ते ५० रुपये प्रति किलो दर मिळत आहे.
ब्रिटन, चीनमध्ये निर्यात बंद….
ब्रिटन देशात कोरोनाचे लॉकडाऊन १२ एप्रिल पर्यंत उठवण्याची शक्यता असल्याने तेथे होणाऱ्या भारतीय द्राक्षांची खरेदी विक्री अंशतः बंद व मागणी कमी आहे. शिवाय चीन , व व्यूहान देशात भारतीय द्राक्ष विक्री ठप्पच असल्याने यंदा निर्यात १५ टक्क्यांनी कमी झाली आहे. कोरोनाच्या धास्तीला उत्पादकांनी घाबरून न परवाने प्राप्त करून किंवा स्थानिक व्यापारी, ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून गतवर्षीप्रमाणे स्वतः मुंबई पुणेसह परराज्यातील लोकल मार्केटला मालाची विक्री करून द्राक्ष व्यवहारास चालना देण्याची सध्यातरी गरज आहे..
उत्पादकाना तातडीने पेमेंट दिले जाते
नाशिक जिल्ह्यातील द्राक्षाची सर्व देशासह परराज्यात उलाढाल सुरळीत आहे. कोरोनाच्या धास्तीला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता, आपल्या द्राक्ष मालाची खरेदी विक्री करावी. मालाच्या प्रतवारी नुसार उत्पादकाना तातडीने पेमेंट दिले जात आहे. व्यापारी वर्गाचे शेतकऱ्यांना नेहमी सहकार्य राहील.
संतोष निकम, द्राक्ष व्यापारी पिंपळगाव