मुंबई – महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सदस्यपदी तसेच भारतीय जनता पार्टी मुंबई प्रदेशच्या सोशल मीडिया प्रमुखपदी भाजपाचे युवा कार्यकर्ते मूळचे नाशिककर सनदी लेखापाल अर्थात सी.ए. प्रतिक कर्पे यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टीने केली आहे.
करपे कुटुंबीयांचा नाशिकच्या रविवार कारंजा येथे व्यवसाय आहे. प्रतीक करपे सन २०१२ पासून मुंबईत शिक्षण आणि व्यावसायिक कामा निमित्त स्थायिक असून त्यांना २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत प्रदेश सोशल मिडीया सहप्रमुखपदी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. करपे मुंबई मध्ये सनदी लेखापाल म्हणून कार्यरत आहेत.
मुंबई स्थित राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासचे कोअर कमिटी सदस्य आणि संघ स्वंयसेवक म्हणून ते सामाजिक कार्यात सहभागी असतात. प्रतीक करपे सन २०१३ पासून भाजपसाठी सामाजिक विषयांवर संशोधन आणि विश्लेषण कामात सक्रिय असून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आर्थिक विषयांवरील रिसोर्स पर्सन म्हणून देखील कार्यरत आहेत.
त्यांनी नोटबंदी व जी एस टी GST या विषयांवर संपुर्ण राज्यात व्याख्याने दिली आहेत. प्रतीक करपे यांच्या पत्नी मुंबईच्या नामांकित रुग्णालयात सुपर स्पेशालिस्ट म्हणून वैद्यक सेवा देत असतात. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नाशिकच्या सामान्य कुंटुबातून येऊन त्यांनी मुंबईच्या भाजप वर्तुळात आपले स्थान निर्माण केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विविध धोरणांमुळे मुंबई कारांचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी आखलेल्या विविध धोरणांचे प्रतीक करपे उत्कृष्ठ सादरीकरण करत असतात. मुंबई भाजपचे अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांनी करपे यांची शिक्षण मंडळ सदस्य पदी आणि मुंबई भाजप च्या सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती करून शुभेच्छा दिल्या आहेत.