नाशिक – शहर परिसरात कोरोनाचे थैमान सुरू झाल्याने पोलिस व महापालिका यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत. राज्य सरकारे रात्रीची जमावबंदी लागू केली आहे तर जिल्हा प्रशासनाने रात्री ८च्या आत घरातचे आदेश काढले आहेत. रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. महापालिका व पोलिस यांच्या पथकांनी कालपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे रात्री ८च्या आत सर्व खासगी दुकाने, कार्यालये बंद करणे आवश्यक आहे. आजही संयुक्त कारवाई केली जाणार आहे. तशी माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे.