नाशिक – गणेश विसर्जनासाठी नाशिक महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. शहरातील सहाही विभागात ठिकठिकाणी सुविधा करण्यात आली असून त्याचा लाभ नाशिककरांनी घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक बाबींना प्राधान्य द्यावे. गोदावरीचे प्रदूषण टाळण्यासाठी गणेश मूर्ती दान करावी, निर्माल्य घंटागाडीतच द्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असेल तर घरीच गणेश विसर्जन करायचे असल्यास अमोनियम बायकार्बोनेट महापालिकेकडून मोफत घ्यावे, असे आवाहनही आयुक्त जाधव यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी विसर्जनाची ऑनलाईन अपॉईंटमेट घ्यावी त्यासाठी https://covidnashik.nmc.gov.in:8002/covid-19.html या वेबसाईटवर बुकींग करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
विसर्जन ठिकाणे आणि सुविधा पुढीलप्रमाणे