नाशिक – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि शहर पोलिस अतिशय सक्रीय झाले आहेत. बाजारात खरेदीसाठी होणारी गर्दी रोखणे आणि कोरोना निर्बंधांचे पालन होण्यासाठी कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळेच नाशिककरांना बाजारात प्रवेश करण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिस व महापालिका यांनी सोमवारपासून (२९ मार्च) सुरू केली आहे. मनपा व पोलिस यांच्या संयुक्त पथकाने घेतलेल्या निर्णयानुसार,
– बाजारात खरेदीसाठी जाताना प्रति तासासाठी एका व्यक्तीला पाच रुपये एवढे शुल्क द्यावे लागणार आहे.
– जे ग्राहक एक तासापेक्षा अधिक काळ बाजारात थांबतील त्यांच्याकडून ५०० रुपये दंड घेतला जाणार आहे.
– प्रवेश फी घेण्यापुर्वी बाजारपेठेकडे जाणारे रस्ते बॅरिकेडसने बंद केले जातील. त्यामुळे ठराविक मार्गातूनच ग्राहकांना बाजारपेठेत प्रवेश असेल.
– आज पहिल्याच दिवशी मनपा व पोलिस यांच्या संयुक्त पथकाने नवापुरा, शालिमार, बादशाही कॉर्नर या भागात अंमलबजावणी केली.
– बाजारपेठेतील फेरीवाले आणि व्यावसायिक यांना पोलिसांकडून पास दिला जाणार आहे. पास नसलेल्या विक्रेत्यांना बाजारात प्रवेश नसेल.
– बाजारपेठेतील प्रवेश शुल्काचा हा निय मेनरोड, पंचवटी बाजार समिती, सिटी सेंटर मॉल येथेही लागू करण्यात आला आहे.
– बाजारपेठेत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेतच प्रवेश मिळणार आहे.