नाशिक – यंदाचा मार्च एण्ड नाशिककरांसाठी खास असणार आहे. कारण, नाशिककरांना मोठे गिफ्ट मिळणार आहे. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांची नाशिककरांनी प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे. येत्या २८ मार्चपासून ओझर विमानतळावरुन कोलकाता आणि सुरत या दोन शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू होत आहे. सद्यस्थितीत या दोन्ही शहरांसाठी थेट विमानसेवा नाही. या सेवेमुळे अवघ्या तासाभरात सुरत तर अवघ्या दोन तासात कोलकाता गाठणे शक्य होणार आहे.
आघाडीची विमानसेवा कंपनी असलेल्या स्पाईसजेट कंपनीकडून ही सेवा मिळणार आहे. तसेच, या कंपनीने स्थगित केलेली नाशिक-हैदराबाद ही सेवा कंपनीकडून येत्या २८ मार्चपासून पुन्हा सुरू केली जात आहे. त्यामुळे येत्या २८ मार्चपासून नाशिकहून हैदराबाद, कोलकाता आणि सुरत या ३ शहरांसाठी सेवा सुरू होत आहे. परिणामी, नाशिकच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या तिन्ही विमानसेवांसाठीचे तिकीट बुकींग कंपनीने सुरू केले असून त्यास उत्तम प्रतिसाद असल्याचे सांगितले जात आहे.
नाशिक विमानसेवेचे वेळापत्रक असे