नाशिक – पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या उपक्रमास नाशिककरांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच गणेश विसर्जनाच्या दिवशी १ लाख १६ हजार ३९९ गणेश मूर्तींचे संकलन झाले आहे. तर ८ हजार ९१५ अमोनियम बायकार्बोनेटचे वितरण मनपाच्यावतीने करण्यात आले. तसेच, दिवसभरात ७७ हजार ६७५ किलो निर्माल्याचे शहरात संकलन झाले आहे.
अमोनियम बायकार्बोनेट वितरण
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे घरीच विसर्जन करण्यासाठी महापालिकेने सहाही विभागात मोफत अमोनियम बायोकार्बोनेट पावडरचे वितरण केले. पंचवटी १९१५ किलो, नाशिक पश्चिम ८७४ किलो, नाशिक पुर्व ७८९ किलो, सातपूर १६७० किलो, नविन नाशिक १६५२ किलो नाशिकरोड २०१५ किलो असे एकुण ८९१५ किलो इतके विभागनिहाय वाटप करण्यात आले.
मूर्ती संकलन
श्री गणेशमूर्ती संकलन व दान करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देवून मंगळवारी (१ सप्टेंबर) रात्री पर्यंत पंचवटी २६७७१, नाशिक पश्चिम १२१५३, नाशिक पुर्व ५७४३, सातपूर २३३७४, नविन नाशिक ३१६६६ नाशिकरोड १६६९२ असे एकुण ११६३९९ इतक्या श्रीमूर्ती संकलन झाले.
निर्माल्य संकलन
नाशिक महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देवून मंगळवारी रात्री पर्यंत नागरिकांनी ७७ हजार ६७५ किलो निर्माल्य निर्माल्य जमा केले. पंचवटी एकूण वाहने – १२ एकूण निर्माल्य -१६८३५ किलो, नाशिक पश्चिम एकूण वाहने – ०७ एकूण निर्माल्य -१०००५ किलो, नाशिक पुर्व एकूण वाहने – ०९ एकूण निर्माल्य -११३८० किलो, सातपूर एकूण वाहने – १२ एकूण निर्माल्य -१७१३० किलो, नविन नाशिक एकूण वाहने – ०९ एकूण निर्माल्य -११०२० किलो, नाशिकरोड एकूण वाहने – ०६ एकूण निर्माल्य -११३०५ किलो, असे एकूण वाहने – ५५ एकूण निर्माल्य -७७६७५ किलो इतके निर्माल्य संकलन झालेले आहे.