मुंबई – गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत असलेल्या महिंद्रा थार (सेकंड जनरेशन)ची निर्मिती नाशकात झाली आहे. त्यामुळे अवघ्या महिनाभरात ही गाडी सूपरडूपर हीट ठरल्यानंतर नाशिकची मान अभिमानाने उंचावली आहे.
वाहन उद्योगाचे क्षेत्र अत्यंत निराळे आहे. कित्येक गाड्या येतात आणि जातात. पण एखादे मॉडेल तरुणांना आवडले तर ते डोक्यावर घेतले जाते. अशावेळी त्याची निर्मिती करणाऱ्यांना आनंद होणे स्वाभाविक आहे. महिंद्रा अँड महिंद्राने थार चे दुसरे एडीशन आक्टोबर २०२०च्या सुरुवातीला लॉन्च केले. त्यानंतर गेल्या महिन्यात दिवाळीदरम्यान डिलीव्हरी सुरू करण्यात आली. एका अहवनालानुसार नोव्हेंबर २०२०मध्ये संपूर्ण देशात २ हजार ५६९ गाड्यांची विक्री केली आहे. विशेष म्हणजे लॉन्चिंगपूर्वीच थारसाठी दोन हजारपेक्षा अधिक बुकींग आले होते.
अत्यंत बोल्ड आणि आकर्षिक डिझाईन, लाजवाब इंटेरिअर आणि अफलातून परफॉर्मन्समुळे थारने ही किमया साधल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. थारची मागणी वाढत असल्याने महिंद्राने या कारचे बेस मॉडेल बंद केले आहे. तर सध्याच्या एडिशनसाठी सहा ते सात महिन्यांचा प्रतिक्षा कालावधी दिला जात आहे. जानेवारी २०२१ पर्यंतच्या कार सध्या विक्रीला गेलेल्या आहेत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
सुरुवीताचे मॉडेल ९.८ लाखांना होते. मात्र आता ते बंद केल्यामुळे नव्या मॉडेलची किंमत ११.९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ग्लोबल एनसीपीएने महिंद्रा थारला ४ स्टार दिले आहेत. विशेष म्हणजे वयोवृद्ध आणि बालकांसाठीदेखील या गाडीला ४ स्टार देण्यात आले आहेत. नाशकात तयार झालेल्या गाडीचा जागतिक स्तरावर होत असलेला गौरवही कौतुकाचीच बाब आहे.