नाशिक – शहरात विवाहित महिलांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच असून, कौटुंबिक नैराश्यातून या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. बुधवारी (दि.२१) दिवसभरात तीन विवाहितांनी आत्महत्या केली. त्यातील दोन महिला पंचवटी परिसरात राहणाऱ्या असून या तिघा महिलांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी पंचवटी आणि सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृता योगेश खडसे (३०, रा.श्याम रंजन बंगला, त्रिकोणी बंगल्याजवळ, कालिकानगर), प्रिया कुणाल गायकवाड (३२, रा.तुळशी अपा., सीतागुंफा जवळ) व रूपाली श्याम बोरसे (२४ रा. राधाकृष्ण नगर, अशोकनगर) अशी आत्महत्या करणाºया विवाहीत महिलांची नावे आहेत. अमृता खडसे यांनी बुधवारी (दि.२१) सकाळ पूर्वी अज्ञात कारणातून आपल्या बंगल्याच्या वरिल मजल्यावरील बेडरूममध्ये गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याबाबत पती योगेश खडके यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना सीतागुंफा भागात घडली. प्रिया गायकवाड यांनी घरात कुणी नसतांना सायंकाळपूर्वी आपल्या बेडरूममध्ये सिलींग पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दोन्ही घटनांप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास अनुक्रमे पोलीस नाईक लिलके व हवालदार साळवे करीत आहेत. तर औद्योगीक वसाहतीतील राधाकृष्ण नगर भागात राहणाºया रूपाली बोरसे यांनी घरात कुणी नसतांना सायंकाळपूर्वी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील लोखंडी हुकास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास श्याम सिध्दापूरे करीत आहेत. दरम्यान रूपाली या वर्षभरापासून आपल्या माहेरी होत्या. काही दिवसांपूर्वीच त्या पतीच्या घरी आल्या होत्या. पती आणि सासू आपआपल्या नियमीत कामावर गेले असता ही घटना उघडकीस आली.