नाशिक – कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी नियमावली राज्य सरकारने आज प्रसिद्ध केली आहे. या नियमावलीमुळे नाशिकमध्ये आणखी निर्बंध लागू होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते खालीलप्रमाणे
—
स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक ते सर्व निर्बंध लागू करण्याची मुभा राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिली आहे व त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये दिनांक ८ मार्च रोजी निर्बंधाविषयी सविस्तर आदेश पारित करण्यात आलेले आहेत व त्याप्रमाणे अंमलबजावणी देखील सुरू आहे.
आज राज्य शासनाने एक अधिसूचना जारी केलेली आहे व त्यामध्ये निर्बंधाविषयी काही सूचना दिलेल्या आहेत. राज्य शासनाने दिलेल्या बहुतांश सूचनांचा अंतर्भाव आपल्या जिल्ह्यात आपण यापूर्वी लागू केलेल्या निर्बंधामध्ये आधीच झालेला आहे.
त्यामुळे आपल्या जिल्ह्यात यापूर्वी काढण्यात आलेल्या ८ मार्च च्या आदेशात नमूद केलेले सर्व निर्बंध जसेच्या तसे लागू राहतील व राज्य शासनाने आज नव्याने लागू केलेले निर्बंध देखील लागू होतील.
यासंदर्भात औपचारिक आदेश उद्या जारी करण्यात येतील.
-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक